बुधवार ठरला करमाळ्यासाठी अपघात वार; दिवसाची सुरुवात आणि शेवट भीषण अपघाताने…


करमाळा – तालुक्यासाठी बुधवार हा अत्यंत काळा दिवस ठरला असून दिवस उगवण्याच्या सुमारास शहराच्या पूर्वेकडे पांडे येथे झालेल्या भीषण अपघातात चार जण दगावल्यानंतर बुधवारच्या सरत्या रात्री साडेदहाच्या सुमारास शहराच्या पश्चिमेला असलेल्या विहाळ येथील कारखान्याच्या अलीकडे पिक अप गाडी ट्रॅक्टरला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एक महीला जागीच ठार झाली असून १४ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

भूम (जि.धाराशिव) तालुक्यातील अंबी येथील भोसले परिवाराच्या मुलीचे आळंदी (पुणे) येथे लग्न होते. हे लग्न आटोपून लावून आंबी या गावी परतत असताना एकूण १७ वऱ्हाडी घेऊन जाणारा पिक अप क्र.MH 25 AJ 4697 करमाळा तालुक्यातील विहाळ आणि करमाळ्याकडून कोर्टी गावाच्या दिशेने जाणारा ऊस वाहतूक करणारा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर यांच्यात हा भीषण अपघात झाला. ही घटना समजताच करमाळा पोलिसांनी आणि सरकारी तसेच खाजगी रुग्णवाहिकांनी घटनास्थळी धाव घेत विहाळ आणि वीट ग्रामस्थ तसेच पुण्याहून करमाळ्याकडे येत असलेले सुनील कदम (गुरुजी) व किरण जाधव यांच्या मदतीने अवघ्या २० मिनिटांत मयत महिलेसह सर्व जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या अपघाताची गंभीरता लक्षात घेऊन करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर यांनी कर्तव्यावर असलेल्या स्टाफ सह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना तातडीने रुग्णालयात हजर होण्याच्या सूचना दिल्या आणि अवघ्या वीसच मिनिटात सर्वच्या सर्व स्टाफ तातडीने रुग्णालयात हजर झाला. डॉ. गुंजकर यांनी सुत्रे हातात घेतली अन बघता बघता सर्व स्टाफ उपचार कामी मग्न झाला. रात्री अकरा ते अडीच वाजेपर्यंत जखमींवर उपचार करून गंभीर रुग्णांना बार्शी, पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठवण्याचे काम सुरू होते.

Advertisement

या अपघातात सौ. सुरेखा बारीकराव उबाळे (वय 65 वर्षे रा. अंबी, ता. भुम) या महीलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर
1) सिराज नूर मोहम्मद शेख वय 30 वर्षे,
2) प्रकाश भोसले वय 60 वर्षे
3) शिवाजी रामभाऊ भोसले वय 45 वर्षे
4) सुमन मुरलीधर गटकल वय 50 वर्षे
5) बाबासाहेब गोरख गटकल वय 35 वर्षे
6) राजुबाई सौदुराम गटकल वय 60 वर्षे
7) पोपट मल्हारी भोसले वय 73 वर्षे
8) सविता रामदेव भोसले वय 70 वर्षे
9) दादा राजू भोसले वय 75 वर्षे
10) संगीता आबासाहेब भोसले वय 50 वर्षे
11) इब्राहिम अब्दुल शेख वय 50 वर्षे
12) सुनील शंकर भोसले वय 45 वर्षे
13) कीर्ती शिवाजी भोसले वय 18 वर्षे
14) सुरेखा शिवाजी गटकल वय 45 वर्षे
सर्व राहणार अंबी ता. भुम हे जखमी झाले आहेत. जखमींपैकी किर्ती भोसले, सुनील भोसले, सुरेखा गटकल, राजूबाई गटकल यांना बार्शी येथे तर शिवाजी भोसले यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. इतर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर दोन्ही वाहनांच्या चालकांनी घटनास्थळावरून पोबारा केला.

या आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन गुंजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता बंडगर, ऑरथोपिडीक सर्जन डॉ. महेश भोसले, डॉ. विशाल शेटे, डॉ. महेश दुधे, भूलतज्ज्ञ डॉ. सुमित पाटील, इन्चार्ज सिस्टर विद्या ढाकणे, सविता थोरात, प्रियंका भोसले, ओहोळ, सरवदे, शिरसट, X-ray टेक्निशियन अजित रायपूरकर, हांडे ब्रदर, शिपाई वीरु सोलंकी, खोकर मावशी, ढेरे मामा, सिक्युरिटी हरिदास किरवे या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसह भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांनी उपचारकामी मोलाचे सहकार्य केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page