मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार -अशोक चव्हाण
करमाळा, प्रतिनिधी – मनोज दादा जरांगे पाटील हे संपूर्ण मराठा समाजातील जनतेच्या गळ्यातील ताईत झाले असून संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. आरक्षणाची लढाई संपेपर्यंत मनोज दादा जरांगे पाटील जो आदेश देतील, तो आदेश मराठा समाज तंतोतंत पाळेल, असा विश्वास श्रीदेवीचा माळ येथील युवा नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
श्रीदेवीचा माळ येथे जरांगे पाटील आले असताना अशोक चव्हाण मित्र मंडळाकडून जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दादासाहेब पुजारी, तुषार जगताप, राजेंद्र फलफले, श्रीराम फलफले, प्रभाकर सोरटे, अभिमान पवार, ओंकार पुजारी, गणेश मचाले, प्रदीप घोरपडे, प्रमोदभाऊ चांदगुडे, कमलाकर सोरटे,
विजय चव्हाण आदीजण उपस्थित होते.
यावेळी श्री कमलाभवानी देवी ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, व्यवस्थापक अशोक गाठे यांनी जरांगे पाटील यांचा श्री कमला भवानी देवी यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.